तुळजापूर दि २ :
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य एन.डी.पेरगाड ,उपप्राचार्य रवी मुदकन्ना ,प्रबंधिका सुजाता कोळी , सर्व विभाग प्रमुख यांच्याहस्ते कर्मचारी अनिल कुलकर्णी ,भारत धनके,दिलीप चौधरी,लक्ष्मण भोजने ,अशोक रोचकरी या कर्मचाऱ्यांचा देवीची प्रतिमा ,शाल ,फेटा ,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने अशोक रोचकरी यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य मुदकन्ना यांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे अनुभव कथन केले व सेवेबद्दल आभार व्यक्त केले तसेच पुढील कारकिर्दीसाठी व उत्तम आरोग्यदायी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान मंदिर व्यवस्थापक तहसीलदार सौ.योगिता कोल्हे यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पेरगाड यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय बागल यांनी केले तर आभार कवडे यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.