वागदरी , दि .३०

अणदूर ता.तुळजापूर येथील अस्थी बुद्ध विहाराच्या प्रांगणात भारतीय  बौद्ध महासभा उस्मानाबाद  जिल्हा शाखा  पदाधिकारी व कार्यकर्त्यांची  महत्त्वपूर्ण विचार मंथन बैठक संपन्न झाली.


   
याबैठकिच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अँड.दिलीप निकाळजे हे  तर प्रमुख मार्गदर्शनक म्हणून प्रा.डी.डी.मस्के, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (नरेगा) तथा गटविकास अधिकारी विलास खिलारे, भारतीय बौद्ध महसभेचे माजी जिल्हा अध्यक्ष गुनवंत सोनवणे, रमाकांत गायकवाड आदी होते. 


प्रारंभी उपस्थित मांनवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिरित्या बुद्ध वंदना घेऊन या बैठकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी धम्म संस्कार व धम्म प्रचार आणि प्रसारासंबधी नियोजन, धम्म चळवळ काल आज आणि उद्या एक चिकित्सा, जिल्ह्यातील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तडवळा आणि अस्थी बुध्दविहार अणदूरसह विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रा.डी.डी.मस्के म्हणाले की, बुद्ध विहार म्हणजे मानवतावादी विचारांचे संस्कार केंद्र असून गाव तेथे बुद्ध विहार असने ही काळाची गरज आहे. 

 विलास खिलारे म्हणाले की, धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बौध्द समाजातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी,आधिकारी यानी संघटीतपणे काम करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस.गायकवाड यांनी  तर सुत्रसंचलन सुकेशन ढेपे यांनी केले व आभार  रमाकांत गायकवाड यांनी केले. 


यावेळी प्रा.विवेकानंद वाहुळे,जयसिंग भालेराव, दत्ता माने,नागनाथ कांबळे,संजय नाना शितोळे,विजय बनसोडे,  दादासाहेब बनसोडे, एस.के.गायकवाड, जयभीम वाघमारे, बाळासाहेब बागडे, शाम नागीले, दयानंद काळुंके,विलास दुपारगुडे,शाम कांबळे, विस्तार अधिकारी जे.टी. वग्गे,मनोहर बनसोडे, महादेव गवळी, संतराम कांबळे, चंद्रकांत सुर्यवंशी, संतोष कांबळे, प्रमोद सुर्यवंशी, रूकमी कांबळे, अविदा कांबळे, संगीता सुर्वे, रंजना कांबळे, प्रभावती कांबळे सह महीला, कार्यकर्ते   उपस्थित होते.
 
Top