तुळजापूर , दि .२९ : 


शहरात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा पुतळा उभा करण्यात यावा या मागणीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख पाहुणे श्रीमंत राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव,  अध्यक्ष  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. 


यावेळी नगराध्यक्ष सचिन  रोचकरी म्हणाले की , तुळजापुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजे यांच्या शेजारी राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेबाचा पुतळा उभा करण्यासाठी तुळजापुर नगर परिषद ठराव घेऊन शासकिय पातळीवर सहकार्य करण्याचे सांगितले .  यावेळी त्यांना   निवेदन देण्यात आले,  जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तुळजाभवानी प्राधिकरणाचे सदस्य विकास मलबा, महेश चोपदार,मानवहित लोकशाही पक्ष जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे, सुभाष कदम ,महेंद्र शिंदे, गोरख पवार, विजय मलकु नाईक, राजाभाऊ घाडगे, धनंजय बगडी, विनोद सरवदे, योगीराज जाधव, शिवराज जाधव, सौरभ कदम, परीक्षीत साळुंके, महेश शिंदे, चेतन पांडागळे उज्वल खलाटे, अजित सस्ते, किरण नावरे, श्रीनाथ बुरूगे, शैलेश शिवरकर,यांच्यासह शिवप्रेमी व जिजमाता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top