तुळजापूर , दि .२९ :
जवाहर नवोदय विद्यालयात रविवार दि . २९ रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस "राष्ट्रीय खेल दिवस " म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी सर्वप्रथम विद्यालयाचे उप प्राचार्य एस. व्हि. स्वामी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आर .एम .अलसेट यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवन परिचय देऊन जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी खेळ किती महत्त्वपूर्ण आहे, यावरती आपले विचार प्रकट केले.
विद्यालयाचे उप प्राचार्य स्वामी यांनी सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये खेळ व व्यायामाचे महत्त्व सांगून ऑलम्पिक मध्ये ध्यानचंद यांनी तीन सुवर्णपदके मिळवून देऊन देशाचा सन्मान वाढविला. यावरती विचार व्यक्त करून सर्वांना खेळ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी एस. डी .खोब्रागडे, यश पाटील, एस.जी . भोरगे, एच. जी. जाधव, पी .एन. जोशी, सुजाता कराड, क्रीडाशिक्षक आर. एम. अलसेट, क्रीडा शिक्षिका एस. आर.अलसेट, डी.पी.बनसोडे , प्रकाश गुर्जर यांची उपस्थिती होती.