तुळजापूर दि . २९ : 

औरंगाबाद विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.रणजितसिंह निंबाळकर यांनी तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या  हस्ते सहसंचालक डॉ. निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

विभागीय सहसंचालक डॉ. रणजीतसिंह निंबाळकर उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्याबरोबर त्यांची अनौपचारिक चर्चा झाली. 


या निमित्ताने त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव  बोरगावकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. एन बी जाधव, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे , प्रा जी. व्ही. पाटील , डॉ. शेषराव जावळे यांची उपस्थिती होती.
 
Top