तुळजापूर , दि .३० : 

काक्रंबावाडी  गावातील कोळेकर महेश बजरंग यांच्या विविध क्षेत्रातील समाजिक  कार्याची दखल घेत भ्रष्टाचार निर्मुलन समिती तुळजापूर यांच्या वतीने  त्याचा सत्कार करण्यात आला.

         
काक्रंबावाडी येथील युवा समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख  उस्मानाबाद जिल्ह्यात झालेली आहे. त्याच्या  कार्याची दखल भ्रष्टाचार निर्मूलन समितीने घेऊन  गौरव  केला. यावेळी  भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे  अध्यक्ष विजय भोसले'  प्रसिद्धी प्रमुख दीपक पलंगे,  उपस्थित होते.
        
कोळेकर महेश  हा काक्रंबावाडी येथील युवा समाजसेवक असून त्यांनी आपल्या कोळेकर महेश मित्रपरिवार आणि आपल्या समाज उपयोगी विचारांनी अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत जसे, वृक्ष रोपण, शैक्षणिक कार्य, लहान मुलांच्या स्पर्धा, शिधापत्रिका, मतदान जनजागृती , युवकांसाठी अनेक कार्यक्रम, तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजनांचा आढावा, शेतीशाळा अशा विविध कार्यामुळे तो  चर्चेत आला.
 
Top