तुळजापूर ,दि .३०


एक हात मदतीचा' या उपक्रमा अंतर्गत तुळजापूर येथील जिजामाता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  मधुकर शेळके यांची सुकन्या कु.श्रद्धा  हिने रोख रक्कम  ५  हजार रुपये भेट दिली.


तुळजापूर येथील कु . प्रतिक्षा अमर बनसोडे हि अवघ्या ६ महिन्याची असल्यापासून तिला मेजर थॅलेसिमिया आहे, म्हणजे तिला दर दोन आठवड्यातून ब्लड ट्रान्समिशन करावे लागते. डॉक्टरांनी तिला बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावयाचा सल्ला दिला आहे. या साठीचा खर्च तब्बल 14 ते 15 लाख रुपये सांगितला आहे, त्या अनुसंगाने तिला आर्थिक मदत करण्यासाठी इयत्ता सहावीत शिकणारी मुलगी श्रद्धा मधुकर शेळके या मुलीने आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे एकत्र करून, कुमारी प्रतीक्षा अमर बनसोडे, हिला पाच हजार रुपयांची मदत केली आहे.
 
Top