परंडा , दि .१२:  फारूक शेख


परंडा शहरातील कुर्डुवाडी नाका
पल्ला गल्ली परिसरातील नागरीकांचा  कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी  नगराध्यक्ष जाकीर  सौदागर यांच्या पुढाकाराने  नवीन पाईप लाईनच्या  कामाचे  भूमिपूजन करण्यात आले.


पल्ला गल्ली परिसरात मागील अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्या मुळे हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी नगराध्यक्ष जाकीर  सौदागर यांच्याकडे केली होती. 
यावरून हा प्रश्न कायम स्वरुपी मिटावा आणि या भागातील कुटुंबांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आज दि.12 रोजी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी 
भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी युवा नेते तनविर मुजावर, 
पाणी पुरवठा अधिकारी जलाल मुजावर, जाकीर मुजावर, अमजद मुजावर , जयंत शिंदे, संजय शिंदे, तानाजी बनसोडे, निजाम सरकार मुजावर, फाजलुदिन मुजावर, वायोजोदीन मुजावर, निजाम मुजावर, शब्बीर मुजावर, हाफिजोदीन काझी, दौलत तांबोळी, याशिन मुजावर, अझहर मुजावर, मुन्ना मुजावर, जावेद मुजावर, हुसेन पठाण, फयुंम मुजावर, अहमद शेख, सद्दाम पटेल, आरिफ दखनी, फारुख तांबोळी, ताजोदीन सयद  जम्मू शेख, जमील शहाबर्फिवाले, अब्दुल पठाण, सलीम पठाण आदी पदाधिकारी व नागरिक  उपस्थित होते. 
 
Top