तुळजापूर दि .१२ : 


तुळजापूर शहरातील  प्रभाग क्रमांक आठ मधील महिला भगिनींसाठी श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाच्या निमित्ताने संपूर्ण प्रभाग परिसरात नगरसेविका सौ आरती रणजित इंगळे यांच्या कडून झोके उभारण्यात आले आहेत.


श्रावणातील नागपंचमी हा महिलांचा  महत्त्वाचा सण यानिमित्ताने ११ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट याकाळात जल्लोषाने धमाल करण्याची संधी महिलांना मिळते . यामध्ये उंच उंच झोका घेणे हे नागपंचमी सणाचे खास वैशिष्ट्य आहे हे लक्षात घेऊन तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ आरती इंगळे यांनी आपल्या प्रभाग  मधील महिला भगिनीसाठी या प्रभागातील कुलस्वामिनी विद्यालय परिसर, भांजी गल्ली, राम मंदिर परिसर ,भगवती विहीर परिसर येथे उंच झोके बांधून दिलेले आहेत . परिसरातील महिलाना  झोक्याचा आनंद घेण्यासाठी होणार आहे.

 नगरसेविका इंगळे यांनी प्रभागातील व शहरातील महिला भगिनींना नागपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top