तुळजापूर दि . १२ : 

मागील ३४ दिवसापासून पाऊस नसल्याने दहिवडी ता.तुळजापूर येथील अंदाजे १३०० एकर वरील सोयाबीन, उडीद,मूग,तूर व इतरही शेती पिके सुकून मोठे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यानी प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत विविध पिकाचा विमा काढला आहे.त्यामुळे कंपनीने पावसाअभावी सुकलेल्या, करपलेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी  लेखी मागणी   शेतकऱ्यानी बजाज अलायन्स जनरल इन्सुरंन्स कंपनीच्या उस्मानाबाद कार्यालयाकडे   केली आहे. 


 निवेदनावर शिवशंकर गाटे,समाधान गाटे,तुकाराम भोसले,हनुमंत अंबुरे,
सोमनाथ काटमोरे,शाम अंधारे,कुंडलीक गाटे,भाऊसाहेब काशीद,अंकुश गाटे,
राहुल काटवटे,संजय गाटे,प्रशांत भालशंकर, राहूल शिंदे,बळीराम सिरसट,भागवत मंडलिक, रविंद्र अंबुरे, अंकुश काळुंके यासह ८३ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
तालुका कृषी अधिकारी यानां दिल्या आहेत.
 
Top