जळकोट, दि.१२ :
तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव व कुन्सावळी येथील युवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
बोळेगाव व कुन्सावळी ता. तुळजापूर येथील युवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, गावच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आवाज उठवू शकते. वंचितांना न्याय फक्त मनसेच्या देऊ शकते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याची ताकद फक्त मनसेतच असल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आपण सर्वजण प्रवेश करित असल्याचे सांगितले.
यावेळी लखन पाटील, राम काळे, लक्ष्मण रूपनूर, दिपक पाटील, आंबादास हळणूरे, ज्ञानेश्वर रूपनूर, धुळबा कोकरे, नरसिंग रूपनूर, दत्ता माने, कुंडलिक देडे, संदीप शिंदे यांच्यासह अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. या कार्यक्रमास मनसेचे मल्लिकार्जून कुंभार उपस्थित होते.