काटी , दि . १९ :

 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे बुधवार  रोजी केंद्र शासन सेंट्रल सेक्टर कार्यक्रम एक हजार शेतकरी उत्पादक कंपनी (FPO ) स्थापन व वृदिंगत  करणे , राष्ट्रय  कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड ) यांच्या अर्थसाहाय्याने व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहमदनगर (वॉटर ) यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी उत्पादन कंपनी स्थापना कार्यक्रमांतर्गत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत "तुळजाभवानी  द्राक्ष उत्पादक" कंपनीची  स्थापना करण्यात आली. 


दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी काटी, सावरगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संघटितपणे द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. काटी, सावरगावसह काटी कृषी मंडळातील 24 गावात 1200 ते 1300 एकरांवर द्राक्ष बागेची लागवड असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास 400 हेक्टर पर्यंत द्राक्ष जातात. त्याअनुषंगाने परिसरातील छोटे-मोठे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जावा . या उद्देशाने तुळजाभवानी द्राक्ष उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली असून या संघात द्राक्षासह कांदा, उडीद, सोयाबीन, कडधान्य पिकविणारे 1000 शेतकरी जोडण्याचे उदिष्ट आहे. 

 यापुढे संघाच्या माध्यमातून द्राक्षासह तिर्थक्षेत्र तुळजापूर तालुक्यात हळद पिक उत्पादनावर भर देणार असून शेतकऱ्यांना  हळद तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणार असल्याचे वॉटर संस्थेचे मॅनेजर कांतीलाल गिते यांनी सांगून सेंटर गव्हर्मेंट शेतकरी उत्पादक जिल्हा कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे असून सचिव प्रकल्प संचालक (आत्मा), सदस्य जिल्हा कृषी अधीक्षक,  गोखले डीडीएम नाबार्ड उस्मानाबाद, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, तालुका कृषी अधीकारी  यांचेही या कंपनीस मार्गदर्शन लाभणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

      
तुळजाभवानी द्राक्ष उत्पादक कंपनी मध्ये बाबा पाटील, संजय फंड, महादेव वडणे, नाबाजी ढगे, निलेश पाटील,  सौ. शोभा मुळे, सौ.सुवर्णा फंड ,सौ.सुवर्णा पाटील , सौ. मिनाक्षी मगर , अविनाश शिंदे  यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण

     तुळजाभवानी द्राक्ष उत्पादक संघाच्या प्रमाणपत्राचे वितरण आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, वॉटर संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कांतीलाल गिते, प्रा. किरण आवटे, सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर समीना पठाण, ॲग्रोनॉमिस्ट गणेश पठारे यांच्यासह तुळजाभवानी द्राक्ष उत्पादक कंपनीचे नुतन संचालक, द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
 
Top