काटी , दि .१९
तुळजापूर तालुक्यातील काटी संजय बजीरंग महापुरे यांची बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बुधवार दि. 18 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद येथे बहुजन रयत परिषदेचे नवनिर्धार व संवाद अभियानाप्रसंगी बहुजन रयत परिषदेचे संस्थापक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई साळुंके यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यावेळी बहुजन रयत परिषदेचे संस्थापक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे , महिला प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंके , राज्य सरचिटणीस ईश्वर शिरसागर , बालाजी गायकवाड , सुरेश पाटू , दिलीप तेलंग , विजयकुमार गायकवाड,त्र्यंबक सुर्यवंशी , संजय सरवदे , दिलीप गायकवाड ,सुनील शिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर त्यांच्या निवडीबद्दल काटी येथील एस.एम.ग्रुपच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी एस.एम. ग्रुपचे सदस्यांसह संजय महापुरे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.