तुळजापूर दि २० :

तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के वाय इंगळे यांची जवाहर नवोदय विद्यालय रायगड येथे बदली झाल्यामुळे  शिक्षक-पालक  समितीचे सदस्य डॉ.अशोक शिंपले , आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संतोष गायकवाड, रमेश शिंदे, समीर पठाण  ,सुरेश  भोरगे ,चक्रपाणी गोमारे, रवींद्र अलसेट ,हरी जाधव, धनाजी देशमुख ,रंजीत वाखारे यांची उपस्थिती होती . याप्रसंगी भांडार प्रमुख रंजीत वाखारे यांची बदली  झाल्यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Top