वागदरी , दि .१९ एस.के.गायकवाड:
बहुजन रयत षरिषदेचे संस्थापक तथा माजी कँबिनेट मंत्री प्रा.लक्ष्मणराव डोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य नव निर्धार व संवाद आभियानाचे दि.१८आँगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा बहुजन रयत परिषदेच्या वतीने उस्मानाबाद येथे जोरात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्याची दखल घेऊन बहुजन रयत परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी अभिजीत दडे तर जिल्हा उपाध्यक्षपदी राजीव गायकवाड , कार्याध्यक्षपदी संजय महापुरे, आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर निवडीचे नियुक्ती पत्र उस्मानाबाद येथे प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, महिला प्रदेश अध्यक्षा.सौ.कोमल साळुंखे, राज्य उपाध्यक्ष सुरेश पाटू, राज्य सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, राज्य उपाध्यक्ष बालाजी गायकवाड,मीडिया सेलचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, दिलीप तेलंग, विजय गायकवाड, दयानंद काळुंके, संजय सरवदे , सुमित कोथिंबिरे, दिलीप गायकवाड, सुनील क्षीरसागरसह कार्यकर्ते उपस्थित होते. नुतन जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, व कार्याध्यक्ष यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.