खंडोबा मंदिर जिर्णोध्दार कार्यावर प्रेरीत होऊन काटकर यांनी दिले योगदान
नळदुर्ग शहरातील प्रतिष्ठित नागरीक विजय काटकर यांनी २५ हजार १०१ रुपयांचे महत्वपुर्ण योगदान दिले आहे.
नळदुर्ग शहरातील चारशे वर्षा पुर्वीच्या मुख्य खंडोबा मंदिराची वाताहात झाली होती. हे मंदिर औट घटका मोजीत असल्याने कोणत्याही क्षणी पडण्याची भिती निर्माण झाली होती. यामुळे नळदुर्ग शहरातील काही तरुणांनी एकञ येवुन ही ऐतिहासीक वास्तु चे जतन व्हावे यासाठी खंडोबा मंदिर जिर्णोध्दार कार्य हाती घेण्याचे ठरवले. त्याला शहरातील जे नागरीक व खंडोबा भक्त मदत करतील त्याच्या सहकार्याने दोन महीन्यापुर्वी कामास शुभारंभ केला. हे कार्य करीत असताना अनेक अडचणी येत आहेत त्यावर मात करीत जिर्णोध्दार कार्य जोमाने सुरु आहे यातुनच प्राचिन मंदिर आकार घेत आहे या कार्याने प्रेरीत होऊन नळदुर्ग शहरातील जेष्ठनागरीक विजय काटकर यांनी स्वइच्छेने पंचविस हाजार एकशे एक्कावन रुपयांचे बहुमुल्य योगदान दिले.
काटकर यांच्या मदतीमुळे जिर्णोध्दार कार्यास गती मिळनार असून या वास्तुचे संगोपन होणार आहे.