काटी , दि .१९ उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी ) ते पांगरदरवाडी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2 कोटी 94 लाखाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या रस्ता कामासाठी सांगवी (काटी) व पांगरदरवाडी येथील नागरिकांनी मागील अनेक वर्ष प्रशासनाकडे पाठपुरावा केला.त्यासाठी आंदोलनही केले. या आंदोलनास अखेर यश आले. या भुमिपुजन कार्यक्रमप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, पंचायत समितीचे सभापती रेणुका भिवा इंगोले, उपसभापती दत्तात्रय शिंदे, यशवंत लोंढे, सांगवी(काटी)चे सरपंच सौ ललिता मगर, मिलिंद मगर,विजय निंबाळकर, विश्वास मगर यांच्यासह सांगवी (काटी)व पांगरदरवाडीचे नागरिक उपस्थित होते.