तुळजापूर दि . ९ :
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती,ब्रिक्स ह्युमन राईट मिशन यांच्या संयुक्त विध्यमाने भूम येथे विभागीय मेळावा पार पडला.
या कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुकानिहाय नविन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थापक प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेश सरचिटणीस शेख आदम मुलानी, जिल्हा अध्यक्ष शिवाजी सावंत यांचे हस्ते पत्र देऊन सत्कर कारण्यात आल्या असून यामध्ये उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष यादव यांची निवड झाली आहे .
त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस प्रथ्वीराज पाटील, तुळजापूर तालुका शहर युवक अध्यक्ष गणेश पाटील, तालुका युवक उपाध्यक्ष सागर काळे, शहर चिटणीस अभिजीत रोटे आदीं पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यावेळी सय्यद रसूल, काशीनाथ शिंदे, सौ.वृंदावनी गवळी, सौ.लता आगळे, ताटे बंडू आबा, सौ.माधूरी मोरे,
भूमचे तालुकाध्यक्ष भागवत साळुंके, विधीतज्ञ अँड.शेषेराव जाधव, सौ.जूलेखा शेख, सुरेश साठे तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट मिशनचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.