नळदुर्ग , दि . ९ : 

महामार्ग रस्ते अपघात मृत्यू संख्या कमी व्हावी,  त्यांना वेळेत उपचार मिळावे म्हणून राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय  यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दुत ही योजना राज्यातील महामार्गावर राबवण्यात आल्याने नळदुर्ग महामार्ग पोलीस केन्द्र अंतर्गत  राष्ट्रीय महामार्ग  त्याअंतर्गत 135 मृत्युंजय  दूतांनी मार्च २०२१  ते आत्तापर्यंत १२ अपघातग्रस्तांचे प्राण  वाचविले आहेत. भारतामध्ये दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. त्यांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. त्यांना रुग्णालयात वेळेत नेले जात नाही. समाजातील काही लोक अपघातग्रस्तांना मदत करतात. परंतु  काही लोक न्यायालय व पोलिसांच्या ससेमिरा टाळण्यासाठी अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत. तसेच जखमी व्यक्ती अनोळखी असेल तर रुग्णालयात उपचारास घेऊन जात नाहीत .याकरीता अपघातग्रस्त व्यक्तीला गोल्डन अवर मध्ये उपचाराकरता व्यवस्थित रित्या नेले जावे व त्यावर योग्य उपचार मिळावेत याकरता हायवे मृत्युंजय दूत हे नेमण्यात आले आहेत. 


राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व पेट्रोल पंप ढाबा, हॉटेल, गॅरेज यावर काम करणारे तसेच महामार्गाच्या आजूबाजूच्या गावातील एकूण 135 सदस्य आहेत. सदर दुत  त्यांना अपघातातील जखमींना कशाप्रकारे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही मृत्युंजय दुत  त्यांना प्राथमिक उपचार याचे साहित्य देण्यात आले आहे. 108 अंबुलान्स बाबत माहिती देण्यात आली आहे. लवकरच त्यांना मृत्यूंजय दूत म्हणून ओळखपत्र देण्याची कारवाई सुरू होत आहे . महामार्गावरील लोक तात्काळ अंबुलन्सला कॉल करीत आहेत .जखमींना तातडीने उपचार करीता दवाखान्यात नेण्यास मदत करीत आहेत .आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस वाहतूक केंद्र नळदुर्ग  हद्दीत सुमारे 12 अपघात ग्रस्त लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले असून नळदुर्ग येथील  बाशिर काझी ,  सुनील भोळे व उमरगा येथील रियाझ काझी, शेषराव लवटे तसेच हद्दीतील इतर मृत्युंजय दुत यांनी अपघात ग्रस्त यांचे प्राण वाचवण्यास मदत केले आहे. त्यांनी अपघातग्रस्तांना  धाडसाने मदत करून प्राण वाचवल्या बद्दल महामार्ग पोलीस केंद्रातर्फे सत्कार करून प्रोत्साहित केले आहे.



 लोकांचे जीव वाचवण्याचे चांगले कार्य करावे, जखमींना मदत केल्यामुळे कोणताही कायदेशीर ससेमिरा लागणार नाही, याबाबत भारताचे राजपत्र 21 जानेवारी 2016 अन्वये कळवण्यात आलेले आहे . तरी सर्व नागरिकांनी अपघातग्रस्त जखमी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्गचे प्रभारी अधिकारी  हनुमंत कवले, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पात्रे, प्रकाश खडतरे व पोलीस  अमलदार यांनी केले आहे.
 
Top