तामलवाडी, दि.९ :
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तेरखेडा तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद येथील शाखा व्यवस्थापक रंगनाथ शिवाजी येवारे यांची अडीच वर्षांपूर्वी तेरखेडा शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी या काळात बँकेची योग्यप्रकारे वसुली व सक्षम आशा योग्य प्रकारच्या कर्जदारास त्वरित कर्ज मंजुरी दिल्यामुळे तेरखेडा परिसरात त्यांचे नाव लौकिक झाले परंतु अचानक काल त्यांची बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुर्डूवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे बदली झाल्याने बँकेच्या अनेक ग्राहकांनी व ग्रामस्थांनी त्यांच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने मानाचा फेटा बांधून पुष्पगुच्छ व पेढे भरऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश शिक्षक व कर्मचारी महाराष्ट्र राज्य हे होते. तसेच उद्योजक बालाजी वैजनाथ खापे, दिनेश पांडुरंग खामकर, पुरुषोत्तम गपाट, उमेश रकटे ,गणेश रकटे, रमेश जाधव, ऋषिकेश जाधव, सुजित होळे ,प्रशांत कुदळे बँक अधिकारी अनिकेत करारे ,चंद्रशेखर मुरारी ,संकेत आसरे कर्मचारी राजाभाऊ जाधव, सचिन काळे हे उपस्थित होते.