जळकोट,दि.९ : 

 तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, राज्य शिखर बँकेचे माजी उपाध्यक्ष व शिक्षण महर्षी सिद्रामप्पा आलुरे- गुरुजी व माजी आमदार व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख या दोघांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाले आहे. 

सिद्रामप्पा आलुरे गुरुजी व गणपतराव देशमुख यांना जळकोट(ता. तुळजापूर) येथे ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.

जळकोट ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या शोकसभेत सिद्रामप्पा आलुरे गुरुजी व गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. या दोन्ही व्यक्तिमत्त्वाच्या विचारांना  शोकसभेद्वारे उजाळा देण्यात आला. या शोकसभेस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, जिल्हा राष्ट्रवादीचे सहचिटणीस महेश कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कृष्णात मोरे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील, जवाहर महाविद्यालयाचे प्र.डॉ. अंकुश कदम ,विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष बबन मोरे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते भालचंद्र पोतदार, नितीन माळी, संगमेश्वर धरणे, माणिक आलुरे, श्रीकृष्ण हासुरे, सुनील माळगे, बसवराज भोगे, श्रीशैल दरेकर, सुनील माने, पिंटू कागे, अमोल आलुरे, शिवराज दरेकर, शिवाजी बसू कदम, विठ्ठल कटोरे आदीसह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ, युवक, ग्रामपंचायत कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top