नळदुर्ग ,  दि . १०

 शिक्षण क्षेञात अतुलनीय कामगीरीमुळे शिक्षणमहर्षी तथा माजी आमदार सि.ना.  आलुरे   गुरुजी यांचे असंख्य विद्यार्थी  सर्वञ विविध क्षेञात  नावारुपाला आले असुन गुरुजीचे विचार , आदर्श हे सर्वानी अंगीकारावे  असे ॲड . अरविंद बेडगे यानी नळदुर्ग येथे शोकसभेत आदरांजली आर्पित करताना सांगितले . 


नळदुर्ग शहर काँग्रेस कमाटीच्यावतीने  माजी आमदार सि . ना. आलुरे गुरूजी याना शोकसभेत श्रध्दाजली वाहण्यात आली. यावेळी ॲड अरविंद बेडगे हे बोलत होते.

सोमवार दि. ९  रोजी  नळदुर्ग शहरातील धरणे संकुलनाच्या सभागृहात सकाळी १० वाजता शोक सभा घेण्यात आली. प्रारंभी सि . ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन आदराजली वाहण्यात आली.

आयोजित शोकसभेत नगरसेवक विनायक अहंकारी , शहबाज काझी , शहराध्यक्ष नवाज काझी , अँड अरविंद बेडगे , अजहर जाहागिरदार , माजी नगरसेवक  सचिन डुकरे , काँग्रेसच्या  महिला  पदाधिकारी सुभद्रा मुळे , शाहेदाबी सय्यद आदीनी  गतकाळातील मराठवाड्याचे प्रती साने गुरुजी म्हणुन सर्वश्रुत आसलेल्या सि .ना. आलुरे गुरुजी यांच्या आठवणीना उजाळा  देत  विविध प्रसंग सांगताना गहिवरुन आले.   


यावेळी नगरसेवक बसवराज धरणे ,  माजी नगरसेवक सुधीर हजारे, माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे , पांडू पुदाले , पञकार  विलास येडगे , शिवाजी नाईक , आमर भाळे , व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे , अतुल हजारे, संदीप सुरवसे आदीसह कार्यकर्ते   उपस्थित होते.
 
Top