लोहारा , दि .१०
येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपविभागीय अभियंता कायम स्वरूपी रुजू करणे , तालुक्यातील अनेक अपघाती वळण असलेल्या ठिकाणी फलक तात्काळ लावावे , अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा लोहारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमुद केले आहे की , राज्य मार्ग 211 ते जेवळी, धानोरी, माकणी ते जिल्हा सरहद्द रस्ता प्रजिमा 45 किमी 00ते 3/200 ची तात्काळ दुरुस्ती करण्याचे सांगुन जेवळी ते धानोरी या दरम्यान गतिरोधक व दिशादर्शक नसल्यामुळे अनेक दुचाकीसह चारचाकी वाहनाचे अपघात होत आहेत. तर दुचाकीस्वार यांना रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळण रस्ता समजत नाही. यासाठी तात्काळ याची दखल घेऊन उपाय योजना करावी, तसेच जेवळी येथील लोहारा वळणापासुन सुरु झालेला जो धानोरी रस्त्ता आहे. त्या रस्त्याच्या मध्ये सय्यद हिप्परगा या गावाकडे जाण्यासाठी वळण आहे , तिथे मागील 2 महिन्यापासून जवळपास 4/5 अपघात झाले आहेत. तरी संबंधित ठेकेदाराने काम पुर्ण झालेला बोर्ड लावला आहे. परंतु तेथे गतिरोधक व दिशादर्शक फलक लावले नाही . स्थानिक लोकांनी वारंवार तोंडी मागणी करुन देखील काहीही प्रतीसाद मिळाला नाही. तरी तेथे तात्काळ दिशादर्शक फलक दर्शनी भागावर लावण्यात यावे व गतिरोधक बसवावे .
याबाबत तात्काळ योग्य ती कारवाई करुन वाहनधारकांना व नागरिकांची तात्काळ गैरसोय दूर करावी व होणाऱ्या अपघातास आळा घालावे.
लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असून ग्रामीण तालुका म्हणून ओळखले जाते. अनेक ग्रामीण भागातील वळण रस्ते असताना देखील दर्शनी भागात फलक लावले गेले नाही. यासाठी तात्काळ तालुक्यातील सर्वच वळण रस्त्यावर दर्शनी भागावर फलक लावण्यात यावे लोहारा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात कायमस्वरूपी उपविभागीय अभियंता कायम करण्यात यावे .अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने ब्रिगेड स्टाईलने लोहारा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी आसेही म्हटले आहे.
या निवेदनावर
संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्ष धनराज बिराजदार ,
संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष बालाजी यादव , उपाध्यक्ष किरण सोनकांबळे , संघटक प्रणील सुर्यवंशी , पवन चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.