काटी , दि . १०
भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचालित योगा प्रमाणीकरण मंडळ नवी दिल्लीद्वारा घेतल्या जाणाऱ्या योग शिक्षक व मूल्यांकन कर्ता या संपूर्ण देशपातळीवरील परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुळच्या रहिवासी तथा शेळगाव (आर) ज्युनिअर कॉलेज, (ता -बार्शी) येथील "जीवशास्त्र" या विषयाच्या प्राध्यापिका सौ.अनिता मोहिते - साळुंके यांनी यश मिळवले आहे .
ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक व सिद्धांतिक स्वरूपात घेतली जाते. या परीक्षेसाठी त्यांना पतंजली योगपिठाचे श्रीराम लाखे, रत्नाकर कुलकर्णी, डॉ.प्रशांत सोनवणे, वल्लभ जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले. आंबिका योगाश्रम आणि मान्यवरांच्या हस्ते आभिनंदन व सत्कार करण्यात आला. त्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी विनामूल्य योगशिबिर व योग मार्गदर्शन करतात.
या पुढे योग प्रसार व प्रचाराचे कार्य करणार असल्याचे प्रा.अनिता मोहिते - साळुंके यांनी सांगितले.