वागदरी,दि .१० एस.के.गायकवाड
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या घटनात्मक आधिकारांची आमलबजावणी करत आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीसह बहुजन समाजातील मानवी हक्कापासून उपेक्षित असलेल्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी शासन, प्रशासनासह समाजातील प्रत्येक घटकांनी सामुहिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन तुळजापूर त तसिलदार सौदागर तांदळे यांनी तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
पारधी आदिवासी विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था अणदूर ता.तुळजापूरच्या वतीने दि.९ आँगस्ट दिनी आदिवासी जननायक क्रांतीदुत बिरसा मुंडा यांची जयंती जागतिक आदिवासी दिन म्हणून तुळजापूर येथील हाँटेल त्रिपुरासुंदरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तहसीलदार तांदळे बोलत होते.
या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी पारधीआदिवासी विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक पंडित भोसले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सौदागर तांदळे,भटक्या विमुक्त विकास परिषदेचे प्रांत कार्याध्यक्ष नरसिंग झरे, प्रांत अध्यक्ष प्रा.लक्ष्मण सुपनार, उपाध्यक्ष विजय वाघमारे,पारधी समाज कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल काळे,आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरच्या एस.एम.वेलपुला मँडम,कर्मचारी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळू भोसले,रिपाइं (आठवले)चे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के आदी उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतीदुत बिरसा मुंडा व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून आभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारधी सामाज संघटणा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिता भोसले यांनी केले तर सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले व आभार कुंदन भोसले यांनी केले.
यावेळी मंडळाधिकारी अमर गांधीले ,शिंदे ,अनिल भोसले, मच्छिंद्र भोसले, संतोष पवार,रवी भोसले, दयानंद भोसले, कविता शिंदे, चित्रा काळे, राणी भोसले, पिंकी शिंदे,सह युवा कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.