नळदुर्ग , दि . २६ :
गुळहळ्ळी ता .तुळजापूर येथिल कार्यकर्ते सचिन घोडके यांची
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल घोडके यांचे आभिनंदन केले जात आहे.
भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन घोडके याना प्रथम तालुक्याची नंतर जिल्ह्याची आणि आता प्रदेशाची जबाबदारी दिली आहे. आतापर्यंत दिलेल्या जबाबदारीला व्यवस्थितरित्या पार पाडून भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. नव्याने दिलेल्या या जबाबदारीच्या संधीचे सोने करण्याची त्यांना पक्षनेतृत्वाने दिलेली आहे.
नव्या जबाबदारीच्या अनुषंगाने आता नवीन आव्हाने व नवीन काम करण्याची संधी घोडके याना मिळालेली आहे.
आमदार सुजितसिंह ठाकूर , प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल , प्रदेश सचिव प्रेरणा होनराव,अरुण पाठक, तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटिल, सौअर्चना राणाजगजितसिंह पाटिल, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, जिल्हा समन्वयक नेताजी पाटिल, जिल्हाध्यक्ष राजसिंहा निंबाळकर, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे आदीनी सचिन घोडके यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.