तुळजापूर , दि .२८ :
तुळजापूर शहरामध्ये झुंजार हनुमान भजनी मंडळ व दीपक संघ सर्व सभासदांच्या वतीने “श्रीकृष्णजन्माष्टमी” निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि . २७ ऑगस्ट रोजी झुंजार हनुमान मंदिरामध्ये आयोजित रक्तदान शिबिरात एक वाजेपर्यंत 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे ,असे यावेळी नितीन रोचकरी यांनी सांगितले.
यावेळी नितीन रोचकरी, खंडू जाधव, संजू पैलवान, यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमर काळे, दादा साठे, ओमकार काळे, संग्राम नाईकवाडी ,सौरभ रोचकरी अमोल सोनवणे यांनी परिश्रम घेतले