हगलूर ता. तुळजापूर येथिल अशोक दादाराव घुगे यानी इंग्रजी विषयात पीएचडी पदवी मिळविल्याने हगलुर ग्रामस्थाच्यावतीने सरपंच ॲड जयपाल पाटील यानी पुणे येथे घुगे यांच्या निवासस्थानी रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सत्कार करून शुभेच्छा दिल्या . यावेळी व्यवसायिक वसायिक अण्णासाहेब दराडे उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यातील हगलुर गावचे सुपुत्र अशोक घुगे या युवकाने इंग्रजी विषयात पीएचडी पदवी मिळविणारा तुळजापूर तालुक्यातील पहिला युवक ठरला आहे. त्याबद्दल सरपंच पाटील यानी पुष्पहार ,शाल ,श्रीफळ देवुन गौरव केला. त्याचबरोबर उपसरपंच महेश गवळी ,मनोज सुर्यवंशी आदिसह ग्रामस्थ , मित्रपरिवारानी घुगे यांचे आभिनंदन करून शुभेच्छा दिले आहेत.
यावेळी घुगे यानी सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले की,
हगलुरचे सरपंच जयपाल पाटील व अण्णासाहेब दराडे यांनी माझ्या घरी सदिच्छा भेट देऊन मला शुभेच्छारुपी आशिर्वाद दिल्या. सरपंच व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो.आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा व प्रोत्साहन निश्चितच मोलाचे आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी अनेकांचे आशीर्वाद, मदत व शुभेच्छा मिळाल्याने यशस्वी झालो. भविष्यात अजून काहीतरी चांगलं उपक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहे .