काटी , दि .१

  तामलवाडी पोलीस ठाण्यांतर्गत  येणाऱ्या तामलवाडीसह काटी, सावरगाव, केमवाडी, दहिवडी, धोत्री, खडकी, देवकुरुळी, पिंपळा(बु.), यमगरवाडी, पिपळा (खु.) सुरतगाव (ता. तुळजापूर )  आदी विविध गावांमध्ये सत्यशोधक साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरी करण्यात आली. 

प्रारंभी काटी येथे सरपंच आदेश कोळी , सहाय्यक पोलीस निरीक्षक घुले, तामलवाडी येथे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, सपोनि  बनसोडे, बीट अंमलदार भोसले, सावरगावात सरपंच रामेश्वर तोडकरी, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे आदी विविध मान्यवरांच्या हस्ते साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
         
तामलवाडी परिसरात शांतता, बंधुभाव व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तामलवाडी पोलिसां मार्फत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी विविध ठिकाणी पोलीस निरीक्षक सचिन पंडीत, तामलवाडीच्या  सरपंच सौ. मंगल गवळी, उपसरपंच हमीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक घुले, बनसोडे, काटीत सरपंच आदेश कोळी, उपसरपंच शामल हंगरगेकर, मकरंद देशमुख, संजय महापुरे,बाळु लोंढे, विष्णू कांबळे, विकास क्षिरसागर, परमेश्वर महापुरे, धोत्रीत ग्रामसेवक झाडे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे, राम मस्के, अप्पा मिसाळ, बालाजी मिसाळ, लक्ष्मण मिसाळ, रवि मिसाळ, ज्ञानोबा मिसाळ, सोपान मिसाळ,  दत्ता उबाळे, सहदेव मस्के, सुधीर मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top