इटकळ  दि. १ :

साहित्यरत्न लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त इटकळ व चव्हाणवाडी येथे अभिवादन करण्यातआले.


इटकळ येथील साठेनगर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पुजन दिनेश सलगरे यांच्या हस्तेकरण्यात आले.यावेळी विजयकुमार गायकवाड,विनायक देडे, साहेबराव क्षीरसागर, अजय गायकवाड,  नागेश क्षीरसागर, नामदेव गायकवाड, धनराज क्षीरसागर,पांडूरंग वाघमारे, यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालयात अरविंद पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा इटकळ येथे मुख्याध्यापक गायकवाड  यांनी प्रतिमेचे पूजन केले.

चव्हाणवाडी (अणदूर) ता. तुळजापूर येथे या वर्षी प्रथमच लहुजी शक्तीसेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष प्रवीण देडे यांच्या सह संतोष भोवाळ,शिवाजी चव्हाण, राम कदम, संजय चव्हाण, ज्ञानेश्वर मुळे,प्रशांत माने,राम देडे,सहदेव देडे उपस्थितीत होते.

 
Top