चिवरी , दि . ०१
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार साजरी करण्यात आली, यावेळी सुरुवातीस प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले .
यावेळी सरपंच अशोक घोडके,लहु शक्ती सेनेचे बाळु देडे, प्रमोद शेंडगे, नामदेव देडे, एकनाथ देडे, दशरथ देडे, बम्हानंद देडे, समर्थ लोंढे,नितीन गायकवाड, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे,मोतीश्री ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव, रघुवीर येवते, कल्याण स्वामी, आदी उपस्थित होते.