उस्मानाबाद , दि .०२

लोहारा पोलीस ठाणे : दाळींब, ता. उमरगा येथील रियाज मुकरम शिलार, वय 35 वर्षे हे दि. 23 जुलै रोजी 06.00 वा. सु. लोहारा येथील माकणी रस्त्यावरुन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 4940 ने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने क्रुझर वाहन क्र. एम.एच. 25 आर 1362 ही निष्काळजीपणे रियाज शिलार हे चालवत असलेल्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. 



या अपघातानंतर नमूद क्रुझरचा अज्ञात चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- फिरोज मुकरम शिलार यांनी दि. 01 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top