तुळजापूर,  दि . १० : 

तुळजापूर नगरीचे नगरसेवक सुनिल रोचकरी यांच्या वाढदिवस निमित्ताने तुळजापूरात क्रिकेट सामन्याचे उदघाटन जल्लोषात करण्यात आले. 
यावेळी सिनेअभिनेता शंतनू गंगणे व नगरसेवक सचिन रोचकरी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून क्रिकेटच्या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले . 

याप्रसंगी सुदर्शन वाघमारे, सुहास गायकवाड, करन साळुंके, राहुल भालेकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती. स्थानिक क्रिकेट खेळाडू अतुल शेळके, ओमकार अपराध , ऋतुराज गाडे, समर्थ साळुंखे ,मेघराज गाडे,विशाल चोपदार, ओमकार चोपदार ,सोनू शेळके याप्रसंगी उपस्थित होते.

यानिमित्ताने तुळजापूर शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले . क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगरसेवक सुनील रोचकरी यांनी वेळोवेळी सहकार्य केले असल्याचे यावेळी स्थानिक खेळाडूंनी सांगितले.
 
Top