तुळजापूर , दि .१०

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत  व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वतीने येथील जिल्हा परिषद मुलांची प्रशाला येथे बुधवार रोजी  प्राचार्य डॉ. एन.डी.पेरगाड , एन एस एस प्रमुख प्रा. शामकांत डोईजोडे ,मुख्याध्यापक सूनिल पांचाळ ,सहशिक्षक रविंद्र स्वामी  यांच्याहस्ते प्रशालेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

 

प्रारंभी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक पांचाळ यांनी सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर उपस्थित प्राध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते विविध वृक्षांचे प्रांगणात रोपण करण्यात आले

 यावेळी प्राचार्य डॉ. पेरगाड ,प्रा.डोईजोडे , यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांचाळ यांनी केले सूत्रसंचालन दिपक सोनवणे यांनी केले तर आभार रविंद्र स्वामी यांनी मानले

.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा.सचिन सगरे,प्रा. संतोष एकदंते ,प्रा.रविंद्र कामे ,प्रा. समीर माने , शाळेचे शिक्षक अनिल शेळके ,अमोल मेंढेकर ,गणेश जाधव ,राधाताई कुचेकर , कर्मचारी प्रवरा हंगरगेकर  ,धर्मेंद्र बनसोडे  इ.जण उपस्थित होते.
 
Top