नळदुर्ग , दि .११
नंदगाव ता तुळजापूर येथे शिक्षणमहर्षी, माजी आमदार स्व.सि.ना.आलुरे गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आदरणीय गुरुजींचे कार्य समाजासाठी आदर्श असे होते, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी गूरुजीनी केली. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सतत जनसामान्यांच्या संपर्कात असणारा गुरुजींचा अलेख अभेद्य आहे, त्यांंचे विचार कायम आचरणात राहतिल.
यावेळी महादेव घंटे , दशरथ काटे , बाबुराव पडसलगे गुरुजी , भिमाशंकर कंरडे ,पंचायत समिती सदस्य सिध्देश्वर कोरे , माजी संरपच गजानन मोरे, आण्णाराव पाटील, कमलाकर तुप्पे, दत्तात्रय शेवाळे,आर्जुन तुप्पे ,युवा नेते वैभव पाटील , संजय पाटील , दिनेश तुप्पे , तम्मा कुभार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.