जळकोट,दि.१० : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील मातोश्री जिजामाता विद्यालय व कै.प्रभाकर भस्मे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दि.१०रोजी दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसह सामाजिक, शैक्षणिक क्षेञात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिवाजी मारेकर हे होते.
तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर पंचायत समिती सभापती सौ.रेणुका भिवाजी इंगोले,
महादेवप्पा रणे,माजी उपसरपंच भिवाजी इंगोले, माजी पाचार्य श्री.देवणे, पञकार निजाम शेख हे उपस्थित होते.
तर सत्कारमुर्ती शुभांगी होळे,विद्या बिराजदार,अबोली पाटील,कल्याणी,मुनाळे,अभिषेक माने,शुभम मारेकर,कुष्णा कोकाटे या गुणवंत विद्यार्थ्यांचा
तसेच भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले आप्पाराव होळे,केंद्रप्रमुख श्री. शिवाजी सुरवसे, शिक्षक जे.व्ही. माने , श्री.देशमुख, जाधव एस.वाय, श्री.घोडके, श्री.गर्जे,श्री.मोरे,श्री.कुंभार,श्री.आवटे यांचा सेवानिवृत्ति बद्दल तर पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा.तुळशिदास दबडे,प्रा.मनिषा नागीले,प्रा.दिपिका कलशेट्टी आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी साफ्टवेयर इंजीनियर महेश सोलंकर,उद्धव इंगोले, सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल निजाम शेख यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य प्रतीभा पवार, सहशिक्षक नेताजी क्षिरसागर,शेखर कलशेट्टी,नागनाथ जमादार, स्वामी.के.व्हि, प्रा.गुणवंत जगताप,विश्र्वास माने,श्री.सिरसट,औदुबंर चव्हाण, गणेश बनसोडे,अनिल धर्मसाले,अशोक शाबासे,सौ.लोखंडे,अलीम शेख, परमेश्वर चौधरी,विठ्ठल बनसोडे,
पालक महादेव होळे,दिगंबर मारेकर,नागनाथ फडताळे,श्रीकांत माने,अरूण पाटिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.क्षिरसागर ,प्रास्ताविक सौ.पवार तर आभार श्री.जमादार यांनी मानले.