इटकळ  दि .८ :

इटकळ ता. तुळजापूर येथील चोरीचे सत्र सुरुच  असुन पुन्हा चोरी झाली.मोटारसायकल, सोने, मोबाईल, चोरट्यांनी लंपास केली.ही घटना रविवार दि .८ रोजी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान घडली.

इटकळ गावामधील  नागनाथ लाकडे यांच्या घरासमोर लावलेली  एम एच २५ एसी ३४१५  दुचाकी पाटील यांच्या घरामध्ये झोपलेल्या चौघांचे मल्टीमीडीया मोबाईल,कपाटात ठेवलेले सोन्याचे  व चांदीचे दागिने आसा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

इटकळ येथे नेहमी चोरीच्या घटना घडत आहेत. एका पाठोपाठ एक आशी चोरी होत आहे.पोलीसांनी अनेक वेळा श्वान पथक,ठसे तज्ञपाचरण केलेआहे.परंतु एकाही चोरीचा छडा लागला नाही. गावात पोलीस चौकीत आसुन सुद्धा हाकेच्या अंतरावर चोरीच्या घटना घडल्याआहेत.

चोरीच्या घटना रोखने व चोरीचा छडा लावणे हे पोलिसांना आव्हानात्मक बनले आहे. याबाबत प्रशांत सुरेश लाकडे यांनी इटकळ पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.
 
Top