तुळजापूर ,  दि . ८ : डॉ. सतीश महामुनी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या आहेत, या त्रुटी दूर करण्यासाठी जाणकार अभ्यासक यांनी पुढे येऊन या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना मांडाव्यात असे आवाहन राज्य समन्वयक सज्जन साळुंके यांनी तुळजापूर येथे केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हास्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन तुळजापूर येथे करण्यात आले होते. या बैठकीसाठी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार बंधू जयराजे निंबाळकर, माजी जि.प. अध्यक्ष धीरज पाटील, गोकुळ शिंदे, गजानन वडणे, नितीन बागल, सचिन पाटील, संतोष बोबडे, नरेश अमृतराव, सुनील रोचकरी, बबन गावडे, अनिल हंगरगेकर, शिवाजी बोधले,  कुमार टोले, जीवनराजे इंगळे, महेश गवळी, आबासाहेब कापसे, गजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, अर्जुन आप्पा साळुंखे, इंद्रजीत साळुंखे, अण्णासाहेब गाटे, प्रतीक रोचकरी, दुर्गेश साळुंखे, सचिन अमृतराव, राम चोपदार, शरद जगदाळे विजय सरडे राजेश सिंह निंबाळकर खंडू जाधव संदीप गंगणे महेश चोपदार नंदकुमार गवाटे, सतीश खोपडे, अण्णासाहेब क्षीरसागर, सौ किरण निंबाळकर,सौ. रेखा लोमटे, सौ मनीषा पाटील, सौ माया चव्हाण, अमीर शेख, बाबा रोठे, बाळासाहेब भोसले यांची उपस्थिती होती. 


युवक नेते जय राजे निंबाळकर यांनी आरक्षण प्रश्नासाठी राजकारण न करता सर्वांनी तातडीने या विषयावर काम केले पाहिजे अशी भूमिका मांडली. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक जीवनराजे इंगळे , कुमार टोले, महेश गवळी, श्री. गव्हाणे, धीरज पाटील, विजय सरडे, विशाल भोसले, सतीश खोपडे, गजानन वडणे आदींनी आपल्या सूचना मांडल्या.

आमदार राणाजगजितसिह पाटील यांनी याप्रसंगी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकर तयार झाला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अनुषंगाने ज्या त्रुटी काढलेल्या असतील त्याची दुरुस्ती केली गेली पाहिजे. आगामी काळात सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मान्य होण्यासाठी भक्कम तयारी झाली पाहिजे सांगून आपण समाजाने जी जबाबदारी देणार आहे ती आपण आमदार म्हणून पूर्ण करू असे सांगितले.

यावेळी राज्य समन्वयक सज्जन साळुंके यांनी यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासाठी खूप वर्षांपासून हेळसांड होत आहे, समाजातील खूप मोठा वर्ग गरिबीमुळे अडचणीत आहे, या गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमदार , खासदार यांनी आपल्या सभागृहात आवाज उठवावा असे आवाहन केले.

खासदार संभाजीराजे यांनी याप्रकरणी अत्यंत सामंजस्याने भूमिका घेऊन आरक्षण प्रश्न हाताळत आहेत, राज्य भरातील मराठा समाजाला या प्रश्नाबाबत त्यांनी महत्व पटवून दिले आहे. दि . ९ ऑगस्ट रोजी पुण्यात या प्रश्नावर चिंतन बैठक बोलावली आहे . तेथे सर्व आमदार , खासदार यांना बोलावले आहे . यासाठी आपल्या जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी बैठकीत उपस्थित होण्याचे आवाहन यावेळी राज्य समन्वयक सज्जन साळुंके यांनी केले. त्यापूर्वी जिल्ह्यातील राजकीय नेते, उद्योजक, समाजसेवक, प्राध्यापक आदींनी या चिंतन बैठकीत विचार आणि सूचना मांडल्या.
 
Top