उस्मानाबाद , दि . २० : 

गोर सेना प्रादेशाध्यक्ष प्रा. संपत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उस्मानाबाद येथे सुरु असलेल्या ' साखळी उपोषण ' आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी पाठींबा जाहिर केला .


गोर सेना महाराष्ट्रच्या वतीने , स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओ बी सी चे राजकिय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना चालु करून त्यावर अध्यक्षाची नेमणूक करावी, ओबीसीची जनगणना करण्यात यावी, यासह इतर मागण्या्ंसाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे .
   

या आंदोलनाला मनसेच्या वतीने पाठींबा देण्यात देण्यात आला . यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवागिरे, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पाशा शेख उपस्थित होते .
 
Top