जळकोट, दि.२९ मेघराज किलजे

 ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन तीव्र करण्यासाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने भटके-विमुक्त मुक्ती दिनानिमित्त मंगळवार दि. ३१ ऑगस्ट  रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


सोलापूर येथील जुळे सोलापूर येथील गंगा लॉन्स येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता हा निर्धार मेळावा पार पडणार आहे. या वड्याची स्वागताध्यक्ष म्हणून विधान परिषद आमदार राजेश राठोड हे राहणार आहेत. या मेळाव्याला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. 


यावेळी पोहरादेवी धर्मगुरू महंत बाबुसिंग  महाराज, महंत कबीरदास महाराज, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे, माजी आमदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री संजय राठोड, माजी आमदार हुसेन दलवाई, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार डॉ. नारायण मुंडे, माजी आमदार लक्ष्मण माने, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे, माजी आमदार रामराव वडकुते, भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित राहून ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.


तरी या निर्धार मेळाव्यास तुळजापूर तालुक्यातील सर्व बंजारा समाज व ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोर सेनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष राजू चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण, जिल्हा सचिव कुमार राठोड, जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी पवार, संतोष चव्हाण, दिनेश राठोड, सचिन राठोड, अर्जुन राठोड, गोविंद राठोड, रवींद्र राठोड, वसंत चव्हाण, विकास चव्हाण, राजू राठोड, सुधाकर राठोड, वसंत महाराज, देविदास राठोड आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पत्रकाद्वारे केले आहे.

 
Top