तुळजापूर , दि .३१ : 

तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडकडील डाॅ.बापूजी साळुंखे सह.गृहनिर्माण संस्थेत  श्रावणी सोमवार व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून  तुळजाभवानी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 



 माजी प्राचार्य डाॅ रमेश दापके यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात डाॅ.शिवाजीराव देशमुख यांची विध्यार्थी कल्याण मंडळाच्या जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. राजेंद्रकुमार घाडगे यांच्या राज सिरॅमिक ॲन्ड बिल्डिंग मटेरियल या दुकानाचे नरिमन पॉईंट पेट्रोल पंपासमोरील नवीन जागेत   स्थलांतरीत जागेत उद्घघाटन करण्यात आले. या संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात तुळजापूरातील डाॅ.बापूजी साळुंखे सह.गृह निर्माण संस्थेतर्फे प्राचार्य रमेश दापके, प्रा.राजेंद्रकुमार घाडगे, सोमाणी  यांच्या हस्ते कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर यशस्वीपणे मात केल्याबद्दल प्रा.अभिमान हंगरकर (काटीकर) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून  यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच भानुदासराव जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
    
या प्रसंगी डाॅ.रमेश दापके, प्रा.डाॅ.शिवाजीराव देशमुख, प्रा.विलासराव जगदाळे, प्रा.अभिमान हंगरकर, प्रा.राजकुमार घाडगे,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पत्रकार उमाजी गायकवाड, प्रबंधक चव्हाण, सोमाजी,सुनिल वाडकर, रामेश्वर लाडुळकर, प्रा.कुकडे, प्रा.आशपाक आतार, प्रा.बाविस्कर,भानुदास जाधव, धनंजय मोरे, निरंजन व्हरकट, योगश कुलकर्णी,अभिमान शिंदे, प्रसाद खामकर, सतिश घोगरे, ज्योतिराम चवळे,  तानाजी भिसे,राहूल भोसले, तानाजी पुजारी,पारवे,खामकर,राहूल घोगरे,वागतकर,वसेकर,भिकाजी शिंदे, मधुकर गंगणे,आप्पासाहेब घोडके आदी मान्यवरांसह प्रा. राजेंद्रकुमार घाडगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
 
Top