काटी , दि .१७ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथे पोलीसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत यंदाही "एक गाव एक गणपती" ची परंपरा सलग 30 व्या वर्षीही अखंडपणे सुरु आहे.
येथील शिवरत्न तरुण मंडळ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पुजन मंगलमय वातावरणात तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. या गणेशोत्सव कालावधीत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, कब्बडी स्पर्धेतील विजेत्यांना शालेय साहित्य वाटप पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत व पोहेकॉ आकाश सुरनर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवरत्न गणेशोत्सव मंडळाच्या काही वर्षांनंतर गावातील ज्येष्ठ लोकांच्या संकल्पनेतून जळकोटवाडीत सर्वानुमते एकमत होऊन 'एक गाव-एक गणपती' संकल्पना उदयास आली. आजतागायत ही संकल्पना तरुण वर्गांनेही ही प्रथा मागील 30 वर्षांपासून अखंडपणे सुरु ठेवली आहे.
"एक गाव एक गणपती " ही संकल्पना राबविल्याबद्दल गावाला शासनामार्फत बक्षिसही मिळाले आहे.
गावात एकच गणपती असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी सामुदायिक आरती होते. या विधायक कार्यक्रमासाठी गावातील लहान मुले, तरुण वर्ग, प्रौढ व्यक्ती, वयस्कर लोक सर्वजण राबतात. यावेळी समाजकारण व राजकारणाला फाटा देऊन सर्वजण एकत्र येतात. 'एक गाव-एक गणपती' संकल्पनेमुळे गावाला पुरस्कार मिळाले आहेत. शिवरत्न गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपती आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीत उच्च ध्वनियंत्रणेला पूर्णपणे फाटा दिला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत फंड यांच्यासह सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ कार्यक्रमात भाग घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडीत आहेत.
यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत फंड, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गोपाळ फंड, उपाध्यक्ष श्रीधर फंड, प्रगतशील द्राक्ष बागायतदार संजय फंड, माजी सरपंच राजाभाऊ फंड, उपसरपंच राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बालाजी जगदाळे, नितीन फंड, जालिंदर देशमुख, सागर बोबडे, युवराज जाधव, बालाजी फंड, मदन फंड, जितेंद्र फंड आदीसह मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.