मुरूम , दि .१७:


बाल विकास सेवा योजना प्रकल्प मुरूम अंतर्गत आलूर येथे 17 सप्टेंबर रोजी पोषण अभियान अंतर्गत आहार प्रात्यक्षिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मोठया संख्येने महिला सहभागी होऊन प्रतिसाद दिला


 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मुरूम चे बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ.सुवर्णा जाधव  त्याचप्रमाणे विभाग पर्यवेक्षिका दूधभाते यांनी मार्गदर्शन केले यावेळी आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे   वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश बेंबळे  तसेच डॉ.शिवगुंडे, गुलाब राठोड अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या. 


या स्पर्धेच्या वेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी पोषण अभियान बाबत महिलांना माहिती दिली तसेच कुपोषण  निर्मुलनामध्ये चौरस आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे  वैद्यकीय अधिकारी डॉ. बेंबळे व डॉक्टर शिवगुंडे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले आयोजित  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विभाग पर्यवेक्षिका श्रीमती दूधभाते यांनी केले.
 
Top