जळकोट, दि.१७
जळकोट ता. तुळजापूर येथील बसवेश्वर चौकातील रहिवाशी, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त सहशिक्षक पांडुरंग आपण्णा यादगौडा(वय-८९) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार (दि.१७) रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.
जळकोट व परिसरात कडक शिस्तीचे एक हाडाचे शिक्षक म्हणून परिचित होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली होती. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नागोबा मंदिराजवळील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,१ भाऊ, भावजय,२ मुले,३ मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.