मंगरूळ , दि .१७ : 

वात्सल्य  सामाजिक संस्थेचे एकल महिलातील काम हे कौतुकास्पद असून त्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभे राहणार असे मत भारतीय जनता पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष  संतोष बोबडे यांनी व्यक्त केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजीच्या जन्मदिवस  निमित्ताने देशभर दि. 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर हा आठवडा सेवा आणि समर्पण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याची सुरूवात  मंगरूळ  ता. तुळजापूर येथील वात्सल्य सामाजिक संस्थेमध्ये एकल महिलांना तुळजापूर तालुका भाजपच्या वतीने चादरींचे वाटप तसेच गोशाळेतील गायींना गोग्रास देऊन  करण्यात आली.
तुळजापूर तालुका पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष  आनंद कंदले यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवनाविषयी माहीती दिली.

प्रारंभी मान्यवरांनी संस्थेतील श्रीगणेशाचे पूजन करून आरती केली.संस्थेअंतर्गत एकल महिलांसाठी चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती घेतली.यावेळी तालुका भाजपच्या पतीने परिसरातील अकरा शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान पत्र पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दिले गेले.

याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष  विजय शिंगाडे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख  साहेबराव घुगे,माजी नगराध्यक्ष  सुहास साळुंखे, रुग्ण कल्याण समिती सदस्य  आनंद कंदले, उद्योग आघाडीचे नारायण नन्वरे,पंचायत समिती सदस्य  चित्तरंजन सरडे, सोसायटीचे चेअरमन  हरिभाऊ वट्टे, बाजार समितीचे संचालक अनिल जाधव युवा मोर्चाचे  मकरंद लबडे,  राम चोपदार, सागर कदम,आरळीचे सरपंच  गोविंद पारवे, काळेगावचे   आनंदराव पाटील, नांदुरीचे उपसरपंच  हनुमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top