मुरुम, दि . १७
उमरगा तालुक्यातील बेटजवळगा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान पंचायत समिती, उमरगा यांच्यावतीने शेतकरी महिलांची ई पीक पाहणी कार्यशाळा गुरुवारी (ता. १६) रोजी घेण्यात आली.
या कार्यशाळेचे अध्यक्ष सरपंच लक्ष्मीताई झाकडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे उपस्थित होते. शासनाच्या आदेशानुसार दि. ३० सप्टेंबर पर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अँड्रॉइड मोबाईल मध्ये ई पिक पाहणी ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतातील सर्व पिकांची नोंद करून घ्यावी. ई पीक पाहणी कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी शेतकरी महिलांना दिले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सीआरपी प्रतिभा शिंदे व वंदना पाटील यांनी परिश्रम घेतले.