अचलेर ,दि .१७ :

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने लोहारा तालुक्यातील अचलेरच्या  भीमनगर येथील बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या लहान चिमुकल्या बालकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.



या विहारात दररोज सकाळ संध्याकाळ बुद्ध वंदना घेतली जाते.त्याचबरोबर या लहान मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त कला  गुणांना वाव मिळावा हा  हेतू मनामध्ये ठेऊन या कार्यक्रमाच्या आयोजकांनी हा उपक्रम हाती घेतला.यामध्ये भाषणे,डान्स,चुटकुले आदी उपक्रम घेण्यात आले.


या कार्यक्रमास भिमनगर मधील बौद्ध उपासक, उपासिका, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंबाजी माने,प्रतिक गायकवाड,सिद्धार्थ माने,रोहन डावरे,मधुकर लोखंडे, अतुल बनसोडे,साहील लोखंडे,पवन डावरे,आलोक माने  आदीनी पुढाकार घेतले.

 
Top