काटी , दि .१७:उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे  पोलीसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा  कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा सर्व गणेशोत्सव मंडळांनी निर्णय घेतला. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात एक गाव एक गणपतीची  प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवार दि. (17) रोजी सायंकाळी आठ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांच्या हस्ते गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया अशा भक्तीमय,उत्साही वातावरणात  सर्वांचे लाडके आराध्य दैवत  विघ्नहर्ता गणरायाच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. 

या मंगलमय पुजनाचे पौराहित्य पुजारी बाळासाहेब कुलकर्णी यांनी केले.
l
पोलीस उपनिरीक्षक पंडित यांचा सत्कार
गणरायाच्या पुजनानंतर काटी सारख्या मोठ्या गावात "एक गाव एक गणपती" संकल्पना राबविण्याच्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्रित बोलावून महत्वाची भूमिका निभावली त्याबद्दल काटी ग्रामस्थांच्या वतीने माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांनी सर्व गणेशोत्सव मंडळाचे कौतुक करुन पोलीस प्रशासनाच्या वतीने  सर्व मंडळाचे आभार मानले. त्यानंतर तामलवाडी  पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 27 गावापैकी 12 गावात "एक गाव एक गणपती" संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
    

यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, पोहेकॉ आकाश सुरनर, सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, बाबुमियॉ काझी,सुजित हंगरगेकर, प्रदीप साळुंके, पत्रकार उमाजी गायकवाड, करीम बेग, अहमद पठाण, जितेंद्र गुंड, शिवलिंग घाणे, भैरी काळे, चंद्रकांत काटे, पोहेकॉ काझी, माजी सैनिक श्रीकांत गाटे  पुजारी बाळासाहेब कुलकर्णी, प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले, विलास सपकाळ, अनिल बनसोडे, राजेंद्र हांडे आदीसह सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top