काटी , दि .०६: उमाजी गायकवाड
आमदार राणाजगजितसिह पाटील यांच्या संकल्पनेतून व तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगरूळ ता .तुळजापूर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरास मंगरुळ व परिसरातील 605 रुग्णांनी उपचार घेतले तसेच 52 रूग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी तेरणा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई येथे पाठवण्यात येणार आहे .
या रुग्णांचा उपचार खर्च , प्रवास खर्च ,जेवण खर्च, राहण्याची व्यवस्था सर्व ट्रस्टमार्फत केली जाणार आहे. या रुग्णांची मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली आहे. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे संयोजक पंचायत समितीचे सदस्य चित्तरंजन सरडे, मंगरूळचे प्रतापसिंह सरडे, ग्रा. प. सदस्य. गोविंद डोंगरे, पांडुरंग हजारे माजी सरपंच सत्तार मुलानी व आमदार राणाजगजितसिह पाटील समर्थक उपस्थित होते.