कळंब , दि .०६ :
महागाई विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी दि.६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पार्टी कळंबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करुन केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड निदर्शने करून राष्ट्रपती भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, देशात महागाईचा भडका उडाला आहे.घरगुती वापरासाठी आवश्यक सर्वत्र वस्तू महाग झाले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे.केंद्र सरकार मात्र जनतेची थेट लूट करीत असल्याचा आरोप करुन पेट्रोल - डिझेलच्या किमतीवर कर बसवुन या वस्तू महाग केले आहेत.
शासन देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांचे मातीमोल किमतीत विकून जनतेस नागडे करीत आहे. या देशाच्या जनतेचे सहा बिलियन डॉलर्सची सार्वजनिक मालमत्ता विकून पाच बिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था निर्माण करणार आहे व सर्व जनतेस बेकारीच्या खाईत लोटल्याचा आरोप केला आहे.
2014 मध्ये 410 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज 884 रुपयास मिळत आहे. प्रथम अनुदान खात्यावर जमा होईल म्हणून गॅस महाग केला व संपूर्ण अनुदान गिळकृंत करून सामान्य जनतेस वेठीस धरले आहे. 2014 पूर्वी 58 रुपये प्रति लिटर मिळणारे पेट्रोल आज 110 रुपये प्रतिलिटर वर नेऊन ठेवले आहे. तर 39 रुपये भाव असलेले डिझेल आज 95 रुपये महाग झाले आहे. त्याचा परिणाम रोज लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला आहे, सर्वच वस्तू महाग झाल्या असेही नाही की,आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम वस्तूंची भाववाढ झाली आहे, पेट्रोलियम वस्तू यापूर्वी कधी नव्हे एवढे स्वस्त झाले आहे. बाजूचे गरीब देश नेपाळ,श्रीलंका व पाकिस्तान भारताकडून पेट्रोल व डिझेल घेऊन या वस्तू आपल्या देशात स्वस्त दराने विकत आहेत.
महागाईला आळा न घातल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही, या विरोधात जनआंदोलन उभा करेल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा.डॉ.संजय कांबळे, ज्येष्ठ नेते भास्कर खोसे,तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,शहराध्यक्ष मुसद्दिक काझी,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष किरण मस्के, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस, तालुकाध्यक्ष अतिक पठाण,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, सागर मुंडे, नगरसेवक सुभाष पवार,शकील काझी,तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके, काँग्रेस पार्टीचे अँड.त्रिंबक मनगिरे, विलास करंजकर,शहर उपाध्यक्ष नारायण चोंदे, शहर उपाध्यक्ष महेबूब शेख,शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब कथले,शहर उपाध्यक्ष नारायण चोंदे,शहर कार्याध्यक्ष महेश पूरी,शहर चिटणीस मक्सुद बागवान,अल्पसंख्याक शहराध्यक्ष सरफराज मोमिन,युवक कार्याध्यक्ष उमेश मडके,शहराध्यक्ष रणजीत खोसे,कार्याध्यक्ष निलेश पोतदार,हुजेब बागवान,सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष राहुल कसबे, जिल्हा उपाध्यक्ष शोभा मस्के, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सलमा सौदागर, शहराध्यक्ष मुन्नी सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा असल्याच्या निवेदनावर प्रदेश संघटक अतुल गायकवाड,जिल्हा अध्यक्ष अँड. तानाजी चौधरी, तालुका अध्यक्ष बालाजी नाईकनवरे ,शहराध्यक्ष दिनेश चोंदे, दत्ता कवडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत